आम आदमी विमा योजना

आम आदमी विमा योजना

राज्यात ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील लोकांसाठी शासनाने केंद्र सरकारची आम आदमी बिमा योजना,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी बिमा योजने संबंधात नोडल एजन्सी, अंमलबजावणी यंत्रणा, लाभार्थ्याचे निकष, विमा हप्त्याची रक्कम, निधीची तरतूद, भरपाईची रक्कम, अंमलबजावणी पध्दती याबाबत तपशील पुढीलप्रमाणे आहेः

– लाभार्थी कोण :-

कुटुंबातील १८-५९ वयोगटातील रोजगार करणारा कुटुंब प्रमुख

1 ) ग्रामीण भागातील 18 ते 59 वयोगटातील भूमिहीन शेतमजूर

2) 2.5 एकर पेक्षा कमी बागायती व 5 एकर पेक्षा कमी जिरायती शेतजमीन धारण करणारे शेतकरी विम्याचा हप्ता :-वार्षिक रु.200/- इतका असून केंद्र शासनामार्फत रु.100/- व राज्य शासनामार्फत रु.100/- इतका विम्याचा हप्ता भारतीय आयुर्विमा महामंडळाला देण्यात येतो.

लाभ :-

नैसर्गिक मृत्यू – रु. 30,000/-

अपघाती मृत्यू – रु.75, 000/-

अपघातामुळे कायमचे अपंग – रु.75, 000/-अपघातामुळे दोन्ही डोळे वा दोन्ही पाय गमावल्यास – रु.75, 000/-अपघातामुळे एक डोळा वा एक पाय गमावल्यास – रु.37,500/-

योजनेंतर्गत लाभार्थ्याच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना रु.100/- प्रतिमहा प्रति विद्यार्थी शिष्यवृत्ती देण्यात येते

अधिक माहिती साठी व अर्ज करण्यासाठी भेट

1) जिल्हाधिकारी कार्यालय

2) तहसलिदार संजय गांधी योजना

3) तलाठी कार्यालय

अधिक माहिती साठी

https://aaby.mahaonline.gov.in/App_ErrorPage/AppError

Leave a Comment