महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई मुदत कर्ज योजना

राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली या  राष्ट्रीय महामंडळ ही योजना राबविते.

अपंग व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून हा  या योजनेचा हेतू आहे .

 राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते. विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर  करून पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लाभार्थी कोण :-

1)      ४०% अपंगत्व असलेला व्यक्ती

2)      वय १८ ते ६० वर्षे

3)     १५ वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी

4)     कोणत्याही बॅंकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा

लाभ :-

:- यायोजने अंतर्गत अपंग व्यक्ती कोणताही लघुउद्योग, प्रक्रियाउद्योग, वस्तू उत्पादन उद्योग,          

     गृह उद्योग करू शकतो.

:-  लहान व मध्यम व्यवसायासाठी ५लाखापर्यंत ५ वर्ष मुदती करता  कर्ज

­:- कर्ज  परतफेडीचा कालावधी  ५वर्षे

:-  व्याजदर ५०,०००/- पर्यंत कर्ज – ५% वार्षिक 

:-  व्याजदर ५०,०००/- वरील कर्ज – ६% वार्षिक

:- अंध, मुकबधीर व मतीमंद प्रवर्गासाठी व्याज दरात ०.५%  टक्के सुट

:- लाभार्थीचासहभाग  ५%

अधिक माहिती साठी  अर्ज करण्यासाठी भेट द्या

सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळा

अधिक माहिती साठी भेट द्यामहाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई मुदत कर्ज योजना

ReplyForward

Leave a Comment